पुष्कर हे हिंदू धर्मियांचे एक मुख्य तीर्थस्थान आहे. ब्रम्हदेवाचे एकुलते एक मंदिर पुष्कर येथे आहे. पुष्कर येथे आल्याशिवाय चार धाम यात्रा पूर्ण झाली नाही असे म्हणतात. पर्यटक अजमेरच्या दर्ग्याला भेट देतात, पण पुष्कर हे तीर्थस्थान अजमेर पासून खूप जवळ आहे हेसुद्धा बऱ्याच जणांना माहित नसते. इथला गुलकंद भारतभर प्रसिद्ध आहे. राहण्यासाठी चांगली हॉटेल्स आहेत. राजस्थान टूरमध्ये पुष्कर हे स्थळ आवर्जून पाहावे असा फुकटचा सल्ला मी देऊ इच्छितो.
No comments:
Post a Comment