Pages

Monday, February 17, 2014

लोकसंख्या वाढीस रोख, अर्थात कुटुंब नियोजन.

     निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. आता काही दिवसात सर्व राजकीय पक्षांचे ५ वर्षांसाठीचे वचननामे जाहीर होतील. भ्रष्टाचार, बेरोजगार, महागाई, चलनवाढ, हेच विषय उगाळले जातील. कुठल्याही राजकीय पक्षाकडे ह्याच्या पलीकडे जाऊन वरील विषयाच्या मुळाशी जाण्यात अजिबात इच्छा नाहीये.

     स्व. संजय गांधी हा एकुलता एक राजकीय नेता होता की त्याने मूळ विषयाला हात घातला होता, तो विषय म्हणजे कुटुंब नियोजन, अर्थात लोकसंख्या वाढीस आळा घालणे. पण नोकरशाहीने त्याचा अतिरेक केला, आणि काँग्रेसला सत्ता गमवावी लागली. आणि त्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी हा विषय विषाप्रमाणे बाजुला  ठेवला.

     खायला पुरेसे अन्न नाही, दिवसभर कष्ट करून रात्री विरंगुळा म्हणून पिढ्याच्या पिढ्या निर्माण करणाऱ्या झोपडपट्ट्या वाढत आहेत. परीक्षा न देता आठवीपर्यंत नापास न करणाऱ्या शिक्षण योजना होत आहेत. अशा प्रकारे काहीही न येणारे सो कॉल्ड शिक्षित बेरोजगार वाढत आहेत. कितीही आणि कोणीही आणि काहीही वल्गना केल्या तरीही वाढत्या लोकसंख्येला आपण किती रोजगार पुरवणार आहोत? आणि ह्या वाढत्या बेरोगारांचा राजकीय कारणांसाठी वापर करून गुंड्गीरीपासून कितपत रोखू शकणार आहोत? आणि ह्या गुंडांना पोसण्यासाठी भ्रष्टाचार करण्यापासून ह्या राजकीय नेत्यांना कोण रोखू शकणार आहे? हा विषय इतका नाजूक आहे, पण सर्व क्षेम व्हावे अशी मनापासून इच्छा असेल तर कुटुंब नियोजन हाच एकमेव पर्याय आहे. 

     अजून सुद्धा लोकसंख्या वाढ, किंवा कुटुंब नियोजन  ह्या विषयाला  शिवायची हिम्मत एकसुद्धा राजकीय पक्ष दाखवत नाही. स्वतःला धाडसी आणि हिम्मतवान समजणाऱ्या आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवालच्या कोणत्याही भाषणात ह्याचा उल्लेख देखील होत नाही. स्व. संजय गांधी ह्यांचे सुपुत्र वरूण गांधी सुद्धा ह्या विषयावर कधी बोललेला आढळत नाही. नरेंद्र मोदी काय आणि राहुल/सोनिया गांधी काय, फक्त गोड गोड स्वप्ने लोकांच्या समोर ठेवून सगळ्यांना फसवायच्या चढाओढीत मग्न आहेत.

     माझे सर्व मतदारांना एकच आवाहन आहे, आपल्या घरी जो कोणी उमेदवार प्रचारासाठी येईल त्याला ह्या विषयाबद्दल त्याचे मत काय हे विचारा. जर तो बोलायला तयार  नसेल तर असल्या भित्र्या आणि अदूरदर्शी उमेदवाराला खड्यासारखे बाजूला ठेवा. माझा हा विचार आपल्याला पटला तर इतरांना त्यासाठी प्रवृत्त करा. 

     शेवटी आपल्या पुढच्या पिढीची काळजी वाटते म्हणून हे आवाहन. नाहीतर काय, खाणारा खाणारा खातोय, मरणारा मरतोय; कष्टकरी थकतोय, गुंड मजा करतोय; फसणारा फसतोय, खोटे आश्वासन देणारा राज्य करतोय हे बघणे आहेच.

Saturday, May 25, 2013

काय चाललय काय हे ?

आय पी एल मध्ये सद्ध्या जे चाललय हे कधीतरी बाहेर पडणार होतच. एकजण अडकला की तो इतरांना सापळ्यात खेचणारच. पण सद्ध्या मुख्य विषय वेगळाच आहे.

हे जे बेटींग चालले आहे तो सगळा पैसा त्या हरामखोर पाकीस्तानी गुंडांना मिळतोय. म्हणजे इनडायरेक्टली ही नालायक मंडळी त्या अतिरेक्यांना पैशाचे पाठबळ देत आहेत. एवढीसुद्धा अक्कल ह्या बैलांना नाही की स्वतःच्या स्वार्थासाठी हे साले हरामखोर देशाच्या शत्रूशी हातमिळवणी करत आहेत. पैशासाठी आई बापाला विकणाऱ्याची ही औलाद नष्ट करायला हवी.

त्यामुळे बेटींग कायदेशीर करावे कि नाही हा विषय तूर्त बाजूला ठेवून ह्या देशद्रोह्यांविरुध्द कडक कारवाई व्हायलाच हवी. फक्त बेटींग बेकायदेशीर आहे म्हणून तेव्हढीच शिक्षा नको, देशद्रोहासाठी कायद्यात जी शिक्षा आहे तीच शिक्षा ह्या बेमुवर्तखोर मंडळींना व्हायलाच पाहीजे.

पाकीस्तानी खेळाडूंना बंदी घाला म्हणणारी मंडळी पाकीस्तानी पंच आणि समालोचकांना कसे काय चालवून घेतात? सगळे साले भारतात येवून पैसे कमावतात आणि हे असे आपल्यावरच उलटतात. त्या पाकीस्तानी पंचाबरोबर पाकीस्तानी समालोचकांना सुद्धा संशयाच्या जाळ्यात खेचायला हवे. आणि फक्त भारतीय खेळाडूच फिक्सिंगमध्ये कसे काय, परदेशी खेळाडू काय धुतल्या तांदुळासारखे स्वछ असू शकतात काय?

आणि दिवसभर बडबड बडबड करत बसणारे ज्येष्ठ क्रिकेटियर मंडळी आता मूग गिळून गप्प का बसलेत? त्यांना काय तो श्रीनिवासन स्वतःच्या खिशातले पैसे देतोय का म्हणून अजून कोणी काही मतप्रदर्शनसुद्धा करायला टाळतोय? शरद पवार, अरुण जेटली ह्यांच्यासारखी क्रिकेटचे राजकारण करणारी मंडळी पण मिडिया समोर यायला का कचरत आहेत? अण्णा हजारे, केजरीवाल तुम्ही तरी काही बोला, ती किरण बेदी एकटीच बोलत आहे.

ह्या सगळ्यात एकच चांगली गोष्ट म्हणजे पोलिस मनापासून काम करत आहेत. ह्या राजकारणारी लोकांना एक कळकळीची विनंती कि ह्यात आता हस्तक्षेप करू नका, आणि तपास संपेपर्यंत स्वतःच्या बगलबच्च्यांना वाचवण्यासाठी बदल्यांचे अस्त्र वापरू नका, बूमरेंग होईल.

Friday, April 5, 2013

कुलदेवता

काही कारणास्तव बऱ्याच जणांना आपल्या देवीच्या दर्शनासाठी जाणे जमत नाही. 
त्यांच्यासाठी हे काही मूळ स्थानावरचे फोटो अपलोड करत आहे. 

 १. बापूजीबुवा , कडापे.

 
२. कालिकामाता, कडापे.


३. एकविरा देवी, कार्ले.

४. विंझाई देवी, ताम्हीणी.


५. केदार जननी.

Saturday, June 2, 2012

आमच्याकडची एक जुनी प्रथा


तुम्हाला आमच्याकडची एक  जुनी प्रथा सांगतो.

आमच्याकडे दिड  दिवसांचा गणपती असतो. गणपतीला गोड मोदक आणि ईतर बिन कांदा लसणाचा शाकाहारी नैवेद्य असतो. बहुतेक  सर्वत्र हेच असते.

मग  गणपती  गेले की गौरी येतात. गौरी बसतात त्या दिवशी परत शाकाहारी नैवेद्य. पण  दुसऱ्या  दिवशी  गौरीचे मुख्य जेवण म्हणजे  मटण. कारण  का  तर गौरी  म्हणजे माहेरवाशीण. तीला शंकराकडे  असले काही  मिळत  नाही. म्हणजे तिकडे ह्या गोष्टीचा शब्दोच्चार  पण  नाही. म्हणून  तिच्या  आवडीचे आणि तिला सासरी मिळत  नाही ते मटण  हे  मुख्य जेवण.

आता  गणपती  बाप्पांचे  नाक  म्हणजे केव्हढे  लांब. त्याला  घरी जाता जाता  वास  येतो. घरी गेल्यावर तो  त्याच्या बाबांकडे  त्याची शंका व्यक्त  करतो. शंकर महाराज म्हणजे शीघ्र कोपी. ते लगेच  निघतात  काय  चाललेय  ते बघायला. पण इकडे  येवून  बघतात  तर काय  जेवणात  सर्व शाकाहारी आणि छान  छान  गोड प्रकार.

कारण  असे होते की मटण  खाऊन  तृप्त  झाल्यावर दुसऱ्या दिवशी  सकाळी सकाळी  गौरी बाईंना गणपतीच्या चुगलखोरी बद्दल शंका येते. ती सगळ्यांना सांगते की आता पटापट  आवरा आणि आज  फक्त  शाकाहारी जेवणच करा. म्हणून  तिसऱ्या  दिवशी आमच्याकडे फक्त  शाकाहारीच नैवेद्य  असतो. हे सर्व  शंकर देव बघतात  त्यावेळेस  त्यांचा राग शांत  होतो, कारण  शंकर देव  यायच्या आत सगळे  चकाचक झालेले   असते.

गोष्ट  छान आहे कि नाही? पण  मतीतार्थ लक्षात  घ्या.  देवाच्या नावाने प्रथा कशी पडते हे लक्षात  येईल.

(गंमतीची गोष्ट बघा, सी.के.पी. माहेरवाशीण शंकर आणि गणपती सारख्या  देवांना सुद्धा उल्लु  बनवते..
हे गमतीत  हं नाहीतर ह्याच्यावर चर्चा कराल.)

Tuesday, May 8, 2012

पुष्कर तलाव, राजस्थान





पुष्कर हे हिंदू धर्मियांचे एक  मुख्य तीर्थस्थान आहे. ब्रम्हदेवाचे एकुलते एक  मंदिर पुष्कर येथे आहे. पुष्कर येथे आल्याशिवाय  चार धाम यात्रा  पूर्ण  झाली  नाही असे म्हणतात.  पर्यटक  अजमेरच्या दर्ग्याला भेट देतात, पण  पुष्कर हे तीर्थस्थान अजमेर पासून खूप जवळ आहे हेसुद्धा बऱ्याच जणांना माहित नसते. इथला गुलकंद  भारतभर प्रसिद्ध  आहे. राहण्यासाठी चांगली हॉटेल्स आहेत. राजस्थान  टूरमध्ये पुष्कर हे स्थळ आवर्जून  पाहावे असा फुकटचा सल्ला मी देऊ इच्छितो.


सेवेम सुझुकी ह्या मुलीने युनोच्या सभेमध्ये केलेले सडेतोड भाषण





सेवेम सुझुकी ह्या मुलीने युनोच्या सभेमध्ये केलेले सडेतोड भाषण ऐकले. १०० टक्के सत्य आहे.
आम्ही सूरपारंब्या खेळलो, मुले विटी-दांडू सुद्धा खेळू शकली नाही.
आम्ही चिन्चा, कैऱ्या पाडून  खाल्ल्यात, मुलांना त्या दुकानात विकत घेऊन खाव्या लागल्या.
आम्ही नदीचे पाणी प्यायलो आहोत, हल्ली नदीचा वापर सांडपाण्यासारखा होतोय.

आमच्या शिक्षकांच्या हातात छडी असे, आमची मुले शिक्षकांच्या खांद्यावर हात टाकून चालतात.
३० पर्यंत पाढे आमच्या अजून लक्षात आहेत, मुलांना टू इंटू टू साठी काल्क्यूलेटर लागतो.

आमच्या वेळेस फुटपाथवर लोक चालायचे, हल्ली फुटपाथ विक्रेत्यांसाठी राखीव असल्यासारखे झालेत.
आम्ही दहा दहा किलोमीटर गप्पा मारत चालत जायचो, हल्ली रस्ता ओलांडायला जीव मुठीत धरावा लागतो.
आम्ही आजोबांना दवाखान्यात घेऊन जायचो, आता मुलांसाठी दवाखान्यात जावे लागते.
मोकळ्या हवेत फिरले कि फ्रेश वाटायचे, आता कधी एकदा ह्या धुराड्यातून सुटून घरात पोचतो असे वाटते.

सगळे काही बदलून गेलेय. निसर्ग बदललाय, शिक्षणपद्धती बदललीय, शिस्त बिघडलीय.
आमच्या मुलांची हि परिस्थिती, तर सेवेम सुझुकी म्हणते तसे खरेच त्यांच्या मुलांची काय परिस्थिती असेल?
वेळेत जागे झालो नाही तर भविष्यात चंद्रावरच्या जागेसाठी पृथ्वीवर युद्धे झाली तर आश्चर्य वाटू नये.

Monday, March 26, 2012

किल्ले सिंधुदुर्ग, मालवण

पोर्तुगीज, ब्रिटीश आणि मोघलांवर लक्ष ठेवण्यासाठी सन १६६४ साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला. मालवण शेजारी एका दगडी बेटावर हा किल्ला बांधला असून सर्व बाजूंनी समुद्राने वेढला गेला आहे. गोव्यावरून शंभरेक तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन ३००० कामगारांकडून ह्या किल्ल्याचे बांधकाम करून घेतले आहे. बांधकामासाठी त्या बेटावरच्याच मोठमोठ्या खडकांव्यातिरिक्त २००० खंडी लोखंड वापरण्यात आले. भक्कम पायाभरणीसाठी काही खंडीभर शिश्याचा वापर केला गेला.


किल्ला पाहायला सुमारे एक तास तरी लागतो. पण किल्ल्याच्या तटबंदीवरून समुद्र पाहण्याची मजा काही औरच आहे. हा व्हिडीओ उन्हाळ्यात घेतला आहे, पावसाळ्यानंतर छान हिरवेगार वातावरण असते.




आशा आहे हा व्हिडीओ पाहिल्यावर आपणपण ह्या किल्ल्याला जरूर भेट द्याल.